Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

वसुंधरा...!

वसुंधरा...!

1 min
1.2K



चित्र पाहता जागतिक वसुंधरा

दिनाची आठवण झाली

म्हणून तर मी संकल्पासह

वसुंधरा संवर्धनासाठी कंबर कसली…


वाटते

जा गरण घालावे कर्माचे

ग ती जीवनास देण्या

ती वाट पाहते

क नवटीशी आस बांधून...


व नराई नजरे आड होता

सुं दर निसर्ग लयास गेला

ध रणी कोपली जणू

रा ने ओसाड झाली...


दि वस काळरात्र झाले आणि

व सता दुष्काळ खणपटीस जरी

स माधान लाभते त्यातही 

    पुन्हा वसुंधरा अंकुरता क्षणोक्षणी...


चि रंतन काळजी मनास

रा त्रंदिवस असते आम्हास आई

यु गानुयुगे तू पोसता

हो ऊनी माय ग आमची

ऊ सने अवसान आणणार नाही

दे ईन सर्वस्व अर्पूनी तुझ्या रक्षणापायी....


जागतिक वसुंधरा दिवस चिरायू होऊ दे.

हीच मनीषा सदा उरी राहे

आई तुझ्याच संवर्धनासाठी

मी ग सदा वरुणाची ही वाट पाहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational