दुःखाच्या राशी
दुःखाच्या राशी
1 min
394
शोधले जेव्हा मी मला
दुःखाने तितकेच कवटाळले मला
सुखाच्या राशी जमवताना
लोभ दाटला या लोचना
बोलुही न शकलेले व्रण मी सोसले
आर्त हाका विरुनी गेल्या भाव ओठी ना पोचले
प्रेमाच्या या वाटेनेही केला माझा घात होता
सावलीचा पहाराही मज सोडून जात होता