आईची माया
आईची माया
1 min
277
(बालगीत)
नको बाळा नको
असा येऊ मागे
आई जरी तुझी
भरेन मी रागे.
करू नको घाई
लहान तू पिल्लू
मी आणते चारा
अजून तू टिल्लू.
जंगल हे मोठे
झाडी दाट जाम
बस इथे घरी
जाऊ नको लांब.
सोबतीला तुझ्या
छोटी गोड चिऊ
सोड माझा हात
बोलावितो काऊ.
एकटाच घरी
आहे तुझा भाऊ
आणेन मी चारा
सारेजण खाऊ.
करू नको हट्ट
फिर बरं मागे.
बाळ माझे गुणी
गुणानेच वागे.