Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

UMA PATIL

Others

3  

UMA PATIL

Others

लेक

लेक

1 min
646


एके दिवशी माझ्या आयुष्यात

सुखाचा, हर्षाचा आला क्षण

लेक माझी लाडाची जन्मली

गोड लेकीमुळे भारावले मन... /१/


इवलीशी परी ती गोंडस

धावते बघा कशी दुडूदुडू

गोजिरे गाल गोबरे फुलवूनी

हसते बघा कशी खुदूखुदू... /२/


आम्हां बाप आणि मुलीचे

आहे बघा सुंदरसे नाते

जणू हिरव्याकंच फांदीवर

असते रम्य लवलवते पाते... /३/


कठोर जरी असतो चेहऱ्याने

तरी बापाचे काळीज मऊ

लेकीच्या सुखासाठी बाप

आता अंगाई लागला गाऊ... /४/


मुलीला पाठवता सासरी

डोळ्यांतून तरळला भाव

बापाच्या डोळ्यांत नेहमी

दिसतो स्वप्नांचाच गाव... /५/


Rate this content
Log in