Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Inspirational

5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Inspirational

अॅड्रेसचा बदलता लँडमार्क

अॅड्रेसचा बदलता लँडमार्क

1 min
343


अड्रेसचा बदलता लँडमार्क...


बारच्या मागे, गणपती मंदिरा जवळ, आर् सी बाफणा समोर बदलुन काठियावाड समोर सांगावे लागते..


अतिक्रमण निर्मुलन कारवाईत

बारचा नंबर आधी लागेल असे वाटले...

पण छे


गणपती मंदिराचा नंबर आधी लागला

आणि उठवला गेला आमचा बाप्पा..


अन्


बघता बघता आमच्या चौकाला

नवी ओळख मिळाली!


आधी वाटले रतनलाल सी बाफना मुळे

नविन सराफा बाजार असेल!

पण छे!


के फॉर काठियावाड

आर् फॉर रेमंड

एम् फॉर मान्यवर मोहे

के सिटि मॉल

अशी मंडळी एका बाजुला

तर दुसर्या बाजुला..

रंगोली

रसिका चे पण के स्डुडीओ झाले आता

टायझर,

कॉटन किंग

या सारखी कपड्यांची दुकाने आलीत!


नाही म्हणायला, २-४ जुनी दुकाने आहेत

अजुनही तग धरून!


संध्याकाळी चौकात

दिवाळी सारखा झगमगाट असतो...


नविन डिजीटल वॉल लक्ष विचलीत करते

वाहान चालकांचे..


पण छे

पाहिल्या सारखी रौनक नसते!


आज दुकानावर असलेली पाटी 

महिन्याभरात बदलेली असते!


आमचा चौक आता आमचा राहीला नाही

कारण तेथे कपडे बाजार भरतो!!


चौक नक्की सांगायचा कोणता?

या टोकाचा कि त्या टोकाचा?

नविन माणसाला काय आणि जुन्या माणसाला काय

गोंधळात टाकतो

गणपती मंदिर शोधत राहतो, लॅंडमार्क म्हणूनी!


अन्


अॅड्रेसचा बदलता लँडमार्क

बदलत जातो

बदलत जातो!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational