Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Warade

Romance

4.6  

Pandit Warade

Romance

सखे गं

सखे गं

1 min
6.9K


घड्याळाचा गजर वाजला

पक्षांचा किलबिलाट झाला

आठवणींचा गोड तुझ्या गं

हृदयी उमाळा दाटून आला ||१||


दाटून आला ऊर सखे गं

आठवणींचा पूर सखे गं

तिथे कसे गं रहावते तुज

माझ्यापासून दूर सखे गं ||२||


दूर सखे गं राहू नको तू

शून्य नजरेने पाहू नको तू

विरहाग्नीत जाळतेस का

उगाच येथून जाऊ नको तू ||३||


जाऊ नको तू रुसून मजवर

फिदा जाहलो मी तुजवर

घाव घालुनि हृदयावरती

सखे राहशील बघत कुठवर ||४||


कुठवर सखये धीर धरू मी

कुठे मनाला स्थीर करू मी

सांग तुला का असे वाटते

जगात वेडा पीर ठरू मी? ||५||

     


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance