Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

घास सुखाचा

घास सुखाचा

1 min
13.7K


बळी कष्टतो म्हणून आम्हा घास सुखाचा

मुखी तयाच्या कधी मिळावा घास सुखाचा?


पक्वान्नाचे ताट पुढे पण असे भुकेला

तुला हावऱ्या कसा गिळावा घास सुखाचा?


कडू बोलणे गणगोतांचे मनात सलते

उतरत नाही घशातून मग घास सुखाचा


त्यांच्या साठी काढशील तू वेळ कधी रे?

ज्यांची धडपड तुला भरवण्या घास सुखाचा


आठवणींची फुले सखे ही घेऊन जा तू

शांतपणाने मला खायचा घास सुखाचा


Rate this content
Log in