Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

UMA PATIL

Tragedy

3  

UMA PATIL

Tragedy

मला मुक्त व्हायचंय...

मला मुक्त व्हायचंय...

1 min
12.9K


मला मुक्त व्हायचंय...

या परिस्थितीतून,

या परंपरेच्या साखळदंडातून,

या रितीरीवाजांच्या बेडीतून,

लोकांच्या वासनेच्या नजरेपासून...


मी जेव्हा आईच्या पोटात होते,

त्यावेळेपासूनच मला चिकटली ही बाईपणाची जात...

खरंच, "जी जात नाही ती जात असते",

हे कोणीतरी म्हटलेल्या वाक्यावर

माझा विश्वास बसायला लागला...


छोटीशी कळी असताना मी

अनेकदा या पशुवृत्तीचा सामना केला...

पण त्या वयात हे काहीच कळत नव्हतं...

तेरा-चौदा वर्षांची झाल्यावर या गोष्टी कळायला लागल्यात,

त्याचबरोबर तीव्र झालं हे बाईपणाचं दुःख...


काॅलेजमध्ये तर शिट्ट्या, घाणेरड्या नजरा,

नको असलेले स्पर्श यानी तर मरून जावंसं वाटायचं...

आत्ता सुद्धा स्थिती बदललेली नाहीये...

आजही माझ्यावर, इतर बायकांवर, मुलींवर

नजरेने बलात्कार करणारे नराधम आहेतच...


आपल्या पुढच्या पिढीचं काय होईल कोणास ठाऊक????

म्हणूनच मला बंदिस्त राहायचं नाही....

मला मुक्त व्हायचंय...

मला मुक्त व्हायचंय...



Rate this content
Log in