वाट
वाट
कधी हरवली वाट
नाही कळलेच मला
धुंडाळले सारे काही
खंत नसेच कुणाला
धुके साऱ्या वाटेवर
मावळून गेली आशा
अनवाणी पाय माझे
झाली सारीच निराशा
धडपड शोधण्यास
वाट ही पायाखालची
भेगाळलं स्वप्न उरी
कशी ती गवसायची
वेध घेते मन सारे
कसा होतो रे थाट
पुन्हा सुटलो धावत
कशी हरवली वाट