Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Others

3  

Abasaheb Mhaske

Others

आनंदयात्री

आनंदयात्री

1 min
13.8K


चालतो मी हरेक नात्यानं न्याय देऊनी

तोलतो मी माणुसकी नैतिकतेच्या तराजू तूनी  

का मग होत जाते सारं काही निरर्थक ?

बदनाम होत जातो मी नाहक प्रत्येक वेळी ?

भोगले मी दुःख तयांचे मोल कधी कळणार का ?

जो नाहीच केला कधी गुन्हा , का मग भोगावी शिक्षा 

का जगावं परावलंबी अन का मग हि भिक्षां देही ?

कुणी पुसावे , कुणी उतरावे , छळतो सवाल हा ...

जाणतो मी ध्याय माझे , उचलतो मी ठोस पाऊले 

मार्गक्रमण करता पुढे , मृत्यूही देऊन जातो हुलकावणी 

हे कसलं प्रारब्ध म्हणावं , अन कुठल्या कर्माची फळ ?

कि आपण फक्त चालत राहावं , जाणता - अजाणता...

भोगणे  आता फार झाले , जगणेही भार झाले ...

मोह माया अपार जरी , कळले गुपित मरणाच्या पलिकडले 

अटळ इथे प्रत्येकालाच येणे जाणे , पंचतत्वात विलीन होणे 

का मग वाट पाहावी नाहक आता कुणी कधी -मधी सोबत करावी 

कशास हवे अमरत्व अन तो भ्रमिष्ट, दिशाहीन प्रवास ...

थोड्यात गोड मानूनी , सोडून द्यावा जगण्याचा हव्यास 

बिनादिक्कत फेकून  द्यावेत हि देहाची लक्तरे .... 

होऊन जावे अनंतकाळाचा प्रवासी ...आनंदयात्री 


Rate this content
Log in