प्रिया आज माझी
प्रिया आज माझी
1 min
7.7K
प्रिया आज माझी
बोलत का नाही ?
मनातल्या गाठी
खोलत का नाही ?
माझे प्रेमामध्ये
चालूच झुरणे
तिच्या कटाक्षाने
नाचती हरणे
भकास शांतता
वाटते नकोशी
प्रियेची ती कुशी
वाटते हवीशी
किती मनवावे ?
कधी ती बोलेल ?
हा दुष्ट अबोला
कधी ती सोडेल ?
नकोसा दिवस
जीवघेणी रात
आपल्या प्रेमाची
आज व्हावी बात