Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rajesh Sabale

Inspirational Others

3  

Rajesh Sabale

Inspirational Others

।।आत्महत्येचं भय।।

।।आत्महत्येचं भय।।

1 min
323


अ हो कशाला झुरताय, उगाच आपल्या घरात|

उद्या पिकल दाना, शेतात आपल्या मळ्यात||


नाही खायला अन्न, पियाला पाणी घरात||

कधी येईल पाऊस, शिजतय काही तरी मनात|

कर्ज बाजरी झालोय, धड धड होती या उरात|

कर्ज मागाय फिरतोय, सावकार येतोय दरात||

मला कशाला आनालय, लगीन करून घरात|

जर मरायचं होत तुम्हा, गळफास लावून घरात||१||


बर वाईट जातील दिवस, अन सुखाच परत येतील|

जरा दमन घ्यावा की राया, हे दिस बी जातील||

झाले म्हातारे आई-बाप, येतय तुमच्या ध्यानात|

बायको पोरांचा इचार येतोय का, तुमच्या मनात||

कोण करील त्याचं, तुमच्या माघारी सार घरात|

आले सोडून माहेर प्रेमाच, तुमच्या मी या घरात||२||


नका सोडून जावू, माय-बाप पोरांचा आधार|

हे सरकार माय-बाप, देतय कुणाला आधार||

करु पोर-पोरींच लगीन, आपल्याच दारात|

काढू नाचत वरात, सुनबाई आणू या घरात||

तुम्हा करते विनवी कारभारी आपल्या घरात|

काही वाईट वंगाळ अनु नका तुमच्या मनात||३



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational