Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Meenakshi Kilawat

Romance

3.7  

Meenakshi Kilawat

Romance

पाऊस

पाऊस

1 min
164


मनातला पाऊस माझ्या

सदोदित हृदयात रहायचा

उगवला मृदगंधित दिवस

मातीमध्ये मनसोक्त भिजायचा


मी अन् तो दोघांचा संगसाथ 

पाऊस व्हायला आवडायचे

भिजून बरसायचे मनसोक्त

अलगद ओठावर रूळायचे


नकळत हृदयात दोघांनी 

एकत्रच हसूनीया शिरायचे 

हृदयात पक्के स्थान मांडूनी

पाऊस होवूनी जगायचे


स्वप्नातच वेदनेला जागर  

डोळ्यात साथीने उतरायचे

पाझरणाऱ्या या अश्रूंमध्ये

सप्तरंगी इंद्रधनू सजवायचे


केसांमधूनी पाठीवरूनी 

मंद झोताने ओघळायचे

रोमछिद्रे ही अंगावरची

हळुवारपणे थेंब लूटायचे 


श्वासातला सुगंध होऊनी या

निसर्गाच्या मस्त ऊबेत डुंबायचे 

पाऊस होवूनी या रानोमाळी 

हात हातात घेवुनी हिंडायचे


या वाऱ्याला श्वासात कवटाळुनी 

शिखरावरती उंच भरारी घ्यायची  

कुशीत ढगांच्या शिरकाव करूनी

दामिनीसम चमकूनिया तळपायचे



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance