हे रंग जीवनाचे
हे रंग जीवनाचे
1 min
735
सोडून सारे टेन्शन
गीत गाऊ आनंदाचे
फुलवू फुला सारखे
हे रंग जीवनाचे ।।
ही प्रित तुझी माझी
देईन सुगंध फुलांचे
उधळूया आपण सारे
हे रंग जीवनाचे ।।
नभी गाती अप्सरा
गीत चंद्र चांदण्याचे
होवून बेभान सारे
हे रंग जीवनाचे ।।
तुझ्या ओठाची लाली
भासे फुल गुलाबाचे
उधळीत गंध गुलाबी
हे रंग जीवनाचे ।।
नटला हा निसर्ग
लेहून वस्र मोलाचे
पाहून धरा ही खुलवी
हे रंग जीवनाचे ।।
डोळ्यात रुप माझे
तुझ्या सखे दिसायचे
हर्षून जाई तेव्हा मी
हे रंग जीवनाचे ।।