सुखाचे क्षण
सुखाचे क्षण
आस प्रत्येका
लाभावेत सुखाचे क्षण
असावे मन
तृप्त.
त्यागुनि स्वार्थ
सुख शोधावे अंतरी
करुनिया परोपरी
मदत.
मिळवाया सुख
अश्रू पुसावेत दूर्बलांचे
करावे अबलांचे
रक्षण.
आधार द्याया
बनावी वृध्दांची काठी
अन्न भुकेल्यांसाठी
पुरवावे.
असेच वेचावे
क्षण सुखाचे पुरेपूर
राहील दूर
दुःखछाया.