Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

SURYAKANT MAJALKAR

Inspirational

2.5  

SURYAKANT MAJALKAR

Inspirational

एक कवी..

एक कवी..

1 min
334


एक कवी खूप खूप रुसला

कागद फाडुन शांत बसला


दौत शाई ओतून मोकळा

कुठे विरल्या शब्दकळा


झाली त्याची ऐशी दैना

कल्पनेची झाली वंचना


दाढी खाजवून आठवेना

केसही ओढुन सुचेना


केले उपाय त्याने नाना

शब्दकल्पना ठाव घेईना


चहा संपली बियर संपली

काडी सिगरेटही संपली


काय करावे प्रश्न उभा

फाकेल कशी शब्दप्रभा


शेवटी विचार रद्द केला

झोळी टाकून झोपी गेला


कविता म्हणे वीज आहे

काव्यकल्पना सहज आहे


म्हणे सर्यांश हाच विचार

कवी जनमनाचा हुंकार


Rate this content
Log in