कविता असते
कविता असते
कविता असते जगण्याचाच भाग
कविता असते अंतःकरणातील आग
सभोवताली चांगले वाईट जे काही घडावे
त्याचेच पडसाद कविमनावर पडावे
कविता असते भुकेल्याची भूक
कविता असते भेदक, अचूक
कविता असते आत्मभान
कविता असते सामाजिक जाण
कवितेने बंधमुक्त, स्वतंत्र असावे
कवितेने माझ्या मानवतेचे गीत गावे
कवितेने माझ्या - ह्दयात घर करावे
कवितेने बहरावे अंगोपांगी ...
कविता असते आत्मिक सुख
कविता असते नवोन्मेषशालिनी प्रज्ञा
कविता इतकी जिवंत असावी की ,
रसिकांच्या रोमा - रोमात भिनावी...