झोका
झोका
सण आखाजीचा आला
आला आनंद घेऊन
पाहून माहेरा लेक
लेक गेली आनंदून
सासुरवाशिण पोर
पोर आलिया माहेरी
दोन दिसाची पाहुणी
पाहुणी जाते सासरी
क्षण सौख्याचे अपुरे
अपुरे साऱ्यांना वाटे
माहेराच्या वाटेतले
वाटेतले सारे भेटे
आभाळ असे वाटे
वाटे मनात जपावे
सासरी असो कायम
कायम सुख नांदावे