देव माणसात
देव माणसात
देवा पांडुरंगा / काय केला गुन्हा
आटला रे पान्हा / आज तुझा ।।
जलमय झाला / सारा परिसर
बुडालं छप्पर / पाण्यामधी ।।
कृष्णा,पंचगंगा / दोन्ही ही कोपल्या
घरात नाचल्या / अंदाधुंद ।।
आला महापूर / घातले थैमान
येऊन सैतान / मनमाने ।।
वाहिला संसार / चुल विझली
धरनी लाजली / पाहूनीया ।।
गेलीया समोर / गोठ्यातली गाय
वासराची माय / पुरामंधी ।।
असा कसा देवा / साधला रे डाव
नाही आली किव / जरा शीही ।।
शेतातल पिक / वाहून रे गेलं
तण ते राहील / बांधावरी ।।
देव माणसात / आज मी पाहिला
धावून तो आला / संकटात ।।