लोकशाही
लोकशाही
1 min
402
रक्ताचा थेंब न सांडता
क्रांती घडवली भिमाने
उपकार मानव जातीवर
केलेत त्या संविधानाने
जातीयतेचे चटके किती
अपमान झाला पदोपदी
वैचारिकता किती मोठी
लिखित घटना दिली संसदी
देशाहीत पहिले प्राधान्य
समता स्वातंत्र्य बंधुता
माणसाशी माणसाने
जपावी ती मानवता
धन्य झाली ही लोकशाही
अशोकचक्र तिरंग्यात डोले
देशाची होईल अफाट प्रगती
संविधान अंमलबजावनी बोले