Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Trupti Naware

Others

3  

Trupti Naware

Others

एकांत उतरतो किनाऱ्यावर

एकांत उतरतो किनाऱ्यावर

1 min
447


समुद्रात टाकलेल्या जाळ्यामध्ये

आकाशातला चंद्र अडकला होता

लोभस, देखणा, बोलका...


माझ्याशी कधीच बोलला नव्हता 

ते जाळे सरकवत, सरकवत

किनाऱ्यावर आणून झटकले

नेमके त्यातले चंद्रबिंबच दिसेनासे झाले

त्याला शोधायची हिम्मतही नव्हती 

तो मिळणार नाही याची खात्रीही होती


उधाणलेल्या लाटा जगलेल्या

वेदनेवर येवून आदळायच्या

म्हणायच्या

"तो तर मोकळा झाला

तू ही मोकळी हो"किंवा 

वाट पहा...सूर्य उगवेलंच, काहीच नाही तर

क्षितिजतरी गवसेल...


आता एकांत उतरतो किनाऱ्यावर 

आकाशाला भिडलेल्या गप्पांमधलं

गाणं रचलं जातं...

पुन्हा त्याच जाळ्यात अडकलेल्या चंद्रावर!!!


Rate this content
Log in