Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Meenakshi Kilawat

Inspirational

3  

Meenakshi Kilawat

Inspirational

स्वयंसिद्धा

स्वयंसिद्धा

1 min
589


नव्हताच ग नारी तुला अधिकार

सु:ख दु:खाची तू खाई ओलांडली, 

किती यातना अन घोर भर्सना

कूठे मर्यादा कूठे दशा भोगली..

अन् जगी तू ,स्वयंसिद्धा सिद्ध जाहली.. //१//


पंख छाटूनी केले तूला निपंख

बाळपणात ही केले तुला त्रयस्त

न घाबरता चढली आप्तांसाठी

बाहुलीपरी बोहल्यावरी बिनधास्त 

अन् जगी तू ,स्वयंसिद्धा सिद्ध जाहली....//२//


नवे क्षितिज गाठण्यासाठी

तत्पर तू सदैव रहात आले

नाही काही करता आले जरी

अपुल्या मुलांना तू घडविले... 

अन् जगी तू ,स्वयंसिद्धा सिद्ध जाहली.. //३//


संसारात करूनी साऱ्यांची सेवा

स्त्री होवूनी ही सीढी चढली 

स्त्री-पुरूषाची मर्यादा ठेवूनी

रणांगणावर ही तू खूप लढली...

अन् जगी तू ,स्वयंसिद्धा सिद्ध जाहली. //४//


स्त्रीजातीला मिळालाय हक्क

घराचा तू उंबरठा ओलांडला

स्वत: मात्र घेतला नाही तू लाभ

संसाराकरीताच भार उचलला...

अन् जगी तू ,स्वयंसिद्धा सिद्ध जाहली...//५//


विश्वसागरात उमटवल्या तू आपुल्या

रक्ताळलेल्या पाऊलखूणा,

नवे क्षितिज गाठण्यासाठी अनेक

अडचनीवर केलीस तप साधणा...

अन् जगी तू ,स्वयंसिद्धा सिद्ध जाहली..//६//


झाली राष्ट्रपती,विश्वसुंदरी,कलाकामिनी

अन् लक्ष्मीबाई मॉ जीजाउचा मान

नारी तू अबला नाही आहे सबला

स्त्री तुझ्या कार्याचा सर्वां अभिमान..

अन् जगी तू ,स्वयंसिद्धा सिद्ध जाहली..//७//


माया,ममता,वात्सल्यात वाहूनी

देत आली अस्तित्वाची बली

पण भरोसा आत्म उंबरठ्यावरी

असणार नाही नारी तूझी रिकामी झोळी

अन् जगी तू ,स्वयंसिद्धा सिद्ध जाहली..//८//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational