Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Mangesh Medhi

Inspirational

3  

Mangesh Medhi

Inspirational

विरहा नंतर....

विरहा नंतर....

1 min
319


मी म्हणतो मी कविता करतो

कला घडवतो नव निर्मीती घडवतो

पण ती म्हणते मी तेथेच घडते

अवतरते जो कविता जगतो कला जगतो

माझ्याच नादात रमतो

जशी प्रकटते तशीच घडवतो

मी ला ती ची गंमत वाटे

मी जेंव्हा मी म्हणतो

तेंव्हा मी फ़क्त मी लाच पाहतो

मी मी चेच गोडवे गातो

मी मी च्याच धुंदीत रमतो

ती ला विसरतो गमावतो

मग हा मी एकटा उरतो

विरहात मी भ्रमीत होतो

रिक्त होऊनी व्याकुळतेने

मी ला ती ची आठवण येते

साद घालतो शोधु लागतो

सभोवताली सर्वांमधे

स्वत:मधे मना मधे

हलके हलके खुणावते

दिसु लागते

जस जसे मी हरवतो

विरुन जातो

तस तसे ती अवतरते

विसरुन मी चे उदारतेने

प्रेम भरे आलिंगन ते

क्षणात मी ला सावरते

तीच ती भरुन उरते

सुंदरतेने नटते

लेउन अलंकार सारे

लावण्य सखी उतरते

प्रणयाने बहरते

सुखाऊन मोहरते

नव निर्मीतीचे अस्सल

समाधन उमटते

मी मग हा

तीज मध्ये बुडतो

सुखावतो

जीव घेण्या दाहकश्या

विरहा नंतर विरहा नंतर....


Rate this content
Log in