Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,
बाप/ वडिल
बाप/ वडिल
★★★★★

© Vijay Sanap

Inspirational

1 Minutes   576    6


Content Ranking

माझ्या वडिलाची / माळरान शेती

पिकवितो मोती / घामातून ।।


बापाच्या घराला / लाकडी वासे

पर्ण कुटी भासे / झोपडी ती ।।


वडिलाच्या अंगी / फाटकीच बंडी

हिवाळ्यात थंडी / अंगा लागे ।।


सर्जा राजा संगे / हाकितो नागर

माय बांधावर / वाट पाही ।।


नागराचा फाळ / बोलतो अभंग

बाप माझा दंग / कामा मधी ।।


बापाच्या पायाला / गरीबीचा जाळ

नशिबी दुष्काळ / सदा त्याच्या ।।


माय बोले बापा / बसा सावलीला

विसावा जीवाला / द्यावे थोडा ।।


घाम नवऱ्याचा / पुसे पदराला

भाळी कुंकवाला / जीव लावी ।।


वडिलाच्या पाया / आले भारी फोडं

पाहूनीया रडं / माय माझी ।।

वडिलाच्या पाहूनीया सावलीला

Rate the content


Originality
Flow
Language
Cover design

Comments

Post

Some text some message..