मिठू मिठू पोपट
मिठू मिठू पोपट
1 min
1.1K
पोपट आमचा
लय लय भारी
लाडात येऊनी
मिठू मिठू करी
ताईचा खास तो
विठू विठू जरी
मुले म्हणतात
राघू राघू सारी
मिरची तो खातो
लाल लाल हरी
नकोशी वाटते
गोल गोल पुरी
गुटुगुटु खातो
डाळिंबाचे दाणे
मिठू मिठू गातो
आनंदाने गाणे