Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Trupti Naware

Classics

3  

Trupti Naware

Classics

मी पावसात हरवलेली

मी पावसात हरवलेली

1 min
269


धुळ वाहुन जाते पावसात

तरीही मी जुन्याच दिवसात

आग ओकणारा सुर्य आठवतो

घोंघावणारा वारा छळतो


धुळ वाहुन जाते पावसात

मी उभी एकटी अंगणात

विजा सोशीक होत जातात

गडगडणाऱ्या ढगात


मनाच्या पातीला माञ

हिरवं करतात..काळ्या निळ्या

श्यामल मेघात..

धुळ वाहुन जाते पावसात


लहान लहान क्षण 

पुन्हा पुन्हा आठवतात

उंच उंच झर्यामधे

खोल खोल दरीचा भास


कधी ऊन कधी पाऊस

कधी मरणयातना..कधी जगण्याची हौस

हेच शिकवतात बरसणार्या सरी

दरवर्षीच्या पावसात


धुळ वाहुन जाते पावसात

नि धुतलेल्या आभाळात

प्रतिबिंबही चमकतात

धुळीचा चिखल होतो


पानगळीची हिरवळ होते

डांबरी रस्त्यात मग 

पाऊसच भिजतो अकस्मात 

मी पावसात हरवलेली....

धुळ नसलेल्या 

शहारलेल्या अंगणात !!!



Rate this content
Log in