गारवा
गारवा
धुंद धुंद ही हवा
चंद्र भासतो नवा
सखे तुझ्या संगती
ना सुखाची वानवा।।१।।
सूर कानी येतसे
मंजुळ कोठूनसे
साद जणू या मना
कुणी तरी देतसे।।२।।
मेघ नभी दाटती
जलकुंभ भासती
शीतल जलधारा
तडतडू लागती।।३।।
थंडगार ही हवा
मंद मंद गारवा
धुंद धुंद नाचतो
मनातला पारवा।।४।।
तू अशी समीप ये
लाडके, माझ्या बये
गारव्यातली मजा
या क्षणी लुटून घे।।५।।