राग रंग
राग रंग
1 min
14.3K
भगव्या निळ्या रंगा मध्ये
आपण असे नको अडकूया
राजकारणाच्या खेळी मध्ये
आपण असे नको फसुया
भगवा, निळा, हिरवा, पांढरा
एकाच ध्वजाचे आहेत रंग
राष्ट्र एकात्मता, सहिष्णूतेचा
आपण करूया नको भंग
आपली माता भारत माता
आपण सर्व बांधव आहोत
भारत मातेच्या ऐक्या साठी
आपण सर्व बांधिल आहोत
विसरून जावू राग, लोभ
मैत्रीचा हात हातात घेवू
दंगा, फसाद सोडून देवू
शांतता, ऐक्य निर्माण करू
विसरून सर्व भेद, भाव
आपण सारे एक होऊ
एकनिष्ठेने करून काम
भारताचे नाव उज्वल करू