Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Warade

Others

5.0  

Pandit Warade

Others

नरजन्म

नरजन्म

1 min
325


अंकुरले बीज

रोप त्याचे झाले

नभाकडे दृष्टी

वाढाया लागले।।१।।


लहानाचे मोठे

कसे केव्हा झाले

फुले आणि फळे

त्याला लगडले।।२।।


ऊन, वारा, थंडी,

पावसाच्या धारा

सोसला वृक्षाने

वादळाचा मारा।।३।।


पाखरे जमती

छायेत बसती

पानगळ होता

उडोनिया जाती।।४।।


तीच गत होते

मनुष्य जन्माची

बाल, युवा, वृद्ध

अवस्था नराची।।५।।


खेळ प्रपंचाचा

मुले बाळे होती

मोठी झाल्यावर

निघोनिया जाती।।६।।


ध्येय ऊरी घ्यावे 

नभी घ्यावी झेप

साधुनिया घ्यावी

नरजन्म खेप ।।७।।


Rate this content
Log in