स्वच्छ भारत ( बालकविता )
स्वच्छ भारत ( बालकविता )
1 min
425
ऐका मित्रांनो ऐका ना
एकत्र काम करुया
शाळा परिसरासह
गावही स्वच्छ करूया
ओला - सुका कचरा
प्लास्टिक दूर करूया
कचऱ्याची अशी आपण
चला वर्गवारी करूया
गाडगेबाबांची शिकवण
गाव सारा खराटा मारूया
घरोघरी जावून लोकांना
दान कचऱ्याचे मागुया
वैयक्तीक स्वच्छता ठेवूया
पाणवठा सफाई राखूया
स्वच्छतेचे सात संदेश
पटवून सर्वांना देवूया
गाव गाव स्वच्छ करत
तालुका जिल्हा करूया
स्वच्छ भारत स्वप्नास
चला आपण पूर्ण करूया