Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Action

3  

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Action

पाण्याची महती

पाण्याची महती

1 min
11.7K



पाण्याची काय सांगू महती

पाण्याविन जीवनाला नाही गती || धृ.||


काढून टाका डोक्यातलं खूळ

पाणी कधीही होत नाही शिळं

पाण्यावर करा तुम्ही प्रिती ||१||


पाणीबचतीची नाही तळमळ

तोटीविना नळ वाहे भळभळ

पाणी तुम्ही घालवता वाया किती ||२||


गाडी धुण्यासाठी पाणी वारेमाप

करू नका लोकहो असले हे पाप

भविष्याची बाळगा थोडी भिती ||३||


जाणून घ्या तुम्ही मोल पाण्याचे

दुष्काळ करतो वांदे खाण्याचे

विनविते आहे तुम्हा धरती ||४||


पाणीवापराचं करा नियोजन

थेंबाथेंबाचं करा हो जतन

आता तरी बदला चुकीची निती ||५||


Rate this content
Log in