Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Others

3  

Abasaheb Mhaske

Others

आर्त हाक कुणब्याची...

आर्त हाक कुणब्याची...

1 min
7.1K


आरे ! मी कुठे म्हणालो ? सूर्य , चंद्र तारे माझेच सारे... 

मी असेही म्हणालो नाही ते सारं आभाळ माझे नावे करा 

मी फक्त एवढंच म्हणालो की माझं हक्काचं मला द्या 

तर तुम्ही केवढा कालवा केला ? आरे सारं मीच तर दिलंय ना   

मी नसतंच पिकवलं काही रानात तर तुम्ही काय पैसे खाल्ले असते ?

आरे नाहीच मागत फार काही फक्त दोन वेळच जेवण , अंगभर कपडा

चारभिंतीतलं आश्वासक छत , पोराबाळाच्या मनातलं छोटंसं स्वप्न 

आरे ! तुमची अब्रू झाकणारे आम्ही ,तुमचे पोशिंदेही आम्हीच विसरलात ?

आरे आमच्या अनेक पिढ्या राबल्या इथे तेव्हा हे दिवस पाहायला मिळालेत 

तुम्हाला काय वाटलं तुमच्या हाती सत्ता म्हणजे तुम्ही काहीही कराल ?

एवढं देखील तुमच्या ध्यानात आलं नाही की आम्ही मनातलं आणलं तर.. 

जागा दाखवून देऊच जरा थोडं थांबा आर्त हाक ह्या कुणब्याची समजून घ्या बाबा 

आरे ! आमच्या आयुष्याच अजून किती मातेरं करता ?

आणि पापाचा घडा आणखी किती भरता ...वेळीच सावध व्हा गड्यानो 

नाहीतर काय होईल ? तिफण उभी राहील आणि हाती रुम्हन येईल 

मग मात्र तुमची पळता भुई थोडी होईल , पायाखालची वाळू तुमची राहणार नाही 


Rate this content
Log in