Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Latika Choudhary

Inspirational

3  

Latika Choudhary

Inspirational

$ उंबरठा $

$ उंबरठा $

1 min
14.6K


आधुनिक जगी स्वतंत्र होऊन मुक्त

 उडतेस नवपंख उगवल्यागत तू

  हसते ,बागडते..बहरते खुशीने

    लाडावते नुकतीच उमलल्यागत तू

घे बये भरारी गगनात उंच उंच तू

 कधी नको विसरू पण तव धरेला

  नभीही अधांतरी भेटतील कदाचित

     छाटणारे, तव पंख कापणारे तुला

लुटणारे लुबाडणारे मोहवतील ते

 गावूनी स्तवनगान भुलवतील तुला

   चळतील चाळवतील भावना तुझ्या

    आव आणूनी शरणाचा मोहवतील तुला

राहूनी सावध, ओळख मुखवटा

 शालीनतेचा, सभ्यतेचा, देखाव्याचा

  क्वचितच भेटेल शिवरायासारखा

    मर्दगडी तरुणीत माऊली पाहणारा

जाणणारा तारणारा रक्षणारा

 मर्दगडी , अर्धांगिनीस न्याय देणारा

  म्हणून सांगते ,खुशाल पड बाहेर

    राहू दे पायी उंबरठा खुणावणारा


Rate this content
Log in