विरह
विरह
1 min
375
विरहाची
ही कहाणी
तुझी माझी
ग साजणी !
ये ना प्रिये
गेली कुठे ?
आठवांची
लाट उठे !
मी एकटा
तुझ्याविना
माझ्या प्रेमा
साथ दे ना !
प्रत्येक ते
क्षण हवे
साजरे ग
तुझ्या सवे
आकाशात
दिसे चित्र
तु अन् मी
ग एकत्र !
विश्वास हा
होवो सार्थ
लाभे मज
परमार्थ !
अजूनही
वाट पाहे
जिवलगा
प्राण वाहे !
सागराने
साक्ष दिली
प्रीत फुले
मी वाहिली !
तुझे माझे
बंध असे
अखंडित
प्रेम वसे !