Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Saroj Gajare

Others

3  

Saroj Gajare

Others

"द्वेष"

"द्वेष"

1 min
311

आठवती मज बालपणींचे

होते खेळ मनमौजीचे

लगोऱ्या, आट्यापाट्या

मेळ गल्लीतल्या मैत्रिणींचे //१//

होते मी थोडी अशक्त

खेळात पडत होती कमी

सर्वजणी डोळा मारून देत

माझ्या हरण्याचीच हमी //२//

असंच एकदा हद्द झाली

पोटातल्या कावळ्यांनी बंड केले

हरताच मी लगोरी खेळात

जीवलग सखीचा द्वेष करू लागले //३//

अभ्यासात होती ती कच्ची

मग मी गणितात मुद्दामच

चुकीची शिकवली प्रमेयं

अन जिरवली तिची मस्तच //४//

गणितातले तिचे मार्क्स पाहून

वडिलांनी तिच्या धू धू धुतले

तेव्हा माझेच मला वाईट वाटून

मी माझेच कान पकडले //५//

अस्सा माझा द्वेष

मैत्रिणीस नडला

मी मात्र त्यातून

चांगलाच धडा घेतला //६//

Rate this content
Log in