सारेच साव होते
सारेच साव होते
1 min
8.5K
झोपेत गुंग जेव्हा सारेच गाव होते
येईल काळ तेव्हा कोणास ठाव होते ।।१।।
होईल घात ऐसा नाही कुणा कळाले
सांगेल कोण आता तेथेच गाव होते ।।२।।
तोडून वृक्षवेली केली सपाट भूमी
केला विकास ऐसा आणीत आव होते ।।३।।
कोरून डोंगराला शेती करावयाशी
डोक्यात फायद्याचे बाजारभाव होते ।।४।।
मातेसमान भूमी जी वंदनीय आहे
ठेऊन भोगदृष्टी घालीत घाव होते ।।५।।
आल्या विकास वाटा हेतू उदात्त होते
खाती लुटून तेव्हा सारेच साव होते ।।६।।