Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Varsha Chopdar

Others

3  

Varsha Chopdar

Others

वयात येऊ लागली बाळे ----

वयात येऊ लागली बाळे ----

1 min
207


विषय - वयात येऊ लागली बाळे


वयात येऊ लागली बाळे ,मिसरूड फुटू लागली

मुलींच्या हसण्या-खिंदळण्यावर , बंधन येऊ लागली


आरशात बघून लाजणे , वारंवार होऊ लागले

एकमेकांकडे बघून ह्रदय धडधडू लागले


गालावरची कळी लागली खुलू

आवडी निवडी लागल्या बदलू


मोबाईल , whatsapp,facebook यांची भाऊगर्दी झाली

नेटवरती एकच झुंबड उडाली


काही जणांना तरुणाईचा जोश लय भारी

म्हणूनच यांची मित्रमंडळी असतात न्यारी


रात्री- रात्री भटकण्यावर असतो त्यांचा जोर

आई- वडिलांच्या जीवाला लावतात घोर


काॅलेज बुडवून पार्टी , चित्रपटाला करतात मजा

आई-वडिलांना अंधारात ठेवून , देतात सजा


फॅशन म्हणू नका , पैशाची नुसती उधळण

वराती मागून घोडे नाचवू, असा त्यांचा पण


यापलीकडे दूरवर , उभा असतो एकटा

परिस्थितीच्या ओझ्याखाली , दबलेला असतो नेटका


ऐन तारुण्यात वडीलांचे छत्र हरवतं

ताईच लग्न ,आईच आजारपण परिस्थिती बदलतं


वेळेच्या आधीच पोक्त , झाल्यासारखं वाटतं

तरुणपण विसरून , ओझ्याखाली वाकाव लागतं


कुठे चंगळवाद , कुठे जबाबदारी एका नाण्याच्या दोन बाजू

म्हणूनच सांगते मित्रांनो, जरा भान ठेवून वागू


सौ. वर्षा प्रमोद चोपदार .



Rate this content
Log in