न ऋण जन्मदेचे फिटे (अभंग रचना)
न ऋण जन्मदेचे फिटे (अभंग रचना)
न ऋण जन्मदेचे फिटे
( अभंग रचना )
जीव कंठी आला I धीर तो धरला |
जन्म असा दिला | तो बाळास ॥ १ ॥
भावविश्व सारे | त्याच्याच भोवती |
शोधे नातीगोती | लेकरात ॥ २ ॥
घास तो चिऊचा | भरवी मायेने |
पुसे पदराने | ओठ बाळा ॥ ३ ॥
सांभाळ तो केला | असा जीवापाड |
पुरवले लाड | रात्रं दिन ॥ ४ ॥
कधीच न ऋण I जन्मदेचे फिटे |
नयनी तो दाटे | मातृ भाव ॥ ५ ॥
किशोर झोटे,
औरंगाबाद