प्रीत
प्रीत
तुझ्या गं सहवासात
कशी प्रीत बहरली
काय सांगू सखे तुज
नशा अशी ही भिनली
रोमरोम शहारले
जशी सर पावसाची
उल्हासीत मन माझे
जेव्हा भेट व्हावयाची
मनी मोहर सुंगधी
असा फुलला अंगणी
प्रीत बहरली सारी
गातो प्रेमात ग गाणी
असे गं अधरावरी
नाव तुझे प्रियतमा
भासे मजला जणू तू
नभातला हा चंद्रमा