Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shreyash Shingre

Others

5.0  

Shreyash Shingre

Others

दिवाळी - तेव्हा आणि आता

दिवाळी - तेव्हा आणि आता

1 min
378


दिवाळी म्हणजे उत्सव असतो

नाविण्य आणि नात्यांचा

माणसातला उत्साह जपणाऱ्या

गहिवरल्या मनांचा 


लहानपणी जिकडे तिकडे 

होती पणत्यांची आरास

आता मात्र चायनीज दिव्यांनी

दिसते घर भकास


लाडू, चकल्या,शंकरपाळे

होती चंगळ नुसती

आता बाहेरचे पदार्थ खाऊन

हालत होते खस्ती


स्वतः बनवलेले कंदील

तेव्हा सर्वांत होते मस्त

आता बाहेरूनच कंदील आणावा लागतो

कारण सगळे असतात व्यस्त


शुभेच्छाही तेव्हाच्या एकदम

आगळ्या वेगळ्या असायच्या

परस्परांना भेटून मगच

फराळाचा फडशा पाडायचा


आताच्या शुभेच्छा झाल्यात जणू

'हॅपी दिवाळी' पुरत्या 

आपलेपणा नसतो हो त्यात

असतात शुभेच्छा नुसत्या


प्रेमाने काढलेली रांगोळी बघता

एकदम नवे वाटायचे

रांगोळीत भरलेल्या रंगांसारखे

आयुष्य जगत राहायचे


दिवाळीला किल्ले म्हणजे

मावळ्यांसारखे वाटायचे

शिवाजी राजांना आठवून मग

मनी धन्य धन्य वाटायचे


फटाके सारे उडवताना

आसमंत उजळून जायचा

मजा आणि उत्साहात मग

"दिवाळसण" साजरा व्हायचा


सण वाटायचे आपले

जेव्हा जवळ होती माणसं

आता सणच दूर गेले

त्यामुळे दुरावली ती माणसं


चाळ सोडली फ्लॅटमध्ये आलो

सारी माणसं झाली दूर

कधीतरी सर्व एकत्र येऊ 

ही असते नेहमी हुरहूर


चाळीमधल्या दिवाळीची त्या 

अजूनही आठवण येते

पुन्हा एकदा लहानपण आठवून

मन गहिवरून येते


Rate this content
Log in