परीक्षा
परीक्षा
1 min
1.0K
संपली आता शाळा
लागे परीक्षेचा ध्यास
तू करु नको चिंता
मी होईल गं पास ।।
आई माझ्या परीक्षेची
तू कशास करते काळजी
मलाबी कळतय आई
तू भरते दोघाची खळगी ।।
तुझी मेहनत आई
नाही जाणार वाया
परीक्षेसाठी पूर्ण मी
झिजवीन माझी काया ।।
स्पर्धा परीक्षेत पोरं
होतील काही नापास
तुझा गं बंड्या आई
नक्कीच होइल पास ।।
फार केलेत गं कष्ट
तू या लेकरा पायी
तुझ्या विश्वासाचा घात
मी होऊ देणार नाही ।।