भक्त आला घरा
भक्त आला घरा
1 min
6.7K
भक्त आला घरा झोपला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला घोकला विठ्ठला
दान मी मागते साकडे घालते
पाव रे श्रीहरी कोपला विठ्ठला
जीवना वाळवंटी झळा तापल्या
श्रावणी काळ का लोपला विठ्ठला
रंगला जीव माझा तुझ्या अर्चनी
चंदनी भाव हा सोपला विठ्ठला
दंगलों मी तुझ्या नामस्मरणात रे
अंतरी प्राण हा गोठला विठ्ठला
भक्त वारीत गोतावळा सोडूनी
दर्शनी गाव हा लोटला विठ्ठला
वृत्त=स्रग्विणी(गजल -४ )
गालगा गालगा गालगा गालगा