सुखाची दिवाळी!!
सुखाची दिवाळी!!
1 min
1.1K
दिवा पेटे दारी
सुख येई घरी
रांगोळीच्या नक्षीने
रंग दिसे मनी
आकाश पेटले
लखलखत्या कंदिलांनी
सुहास दरवळला
दिवाळीच्या उटण्यानी
मोह ना सुटे तो
लाडू करंज्यानी
दिवस संपे त्या
आठवणींच्या फटाक्यांनी
आनंद हा सर्वजगी
दिवाळीच्या सणासाठी
सुख लाभो
सर्वांच्या सुखासाठी!