साधना...
साधना...
1 min
4.0K
झालो रममाण । अनोख्या शक्तीत ।
विठ्ठल भक्तीत । एकरूप ॥१॥
सदा मुखी म्हणू । रामनाम गोड ।
त्यास नाही तोड । अनंताची ॥२॥
हे मनमोहना । कैवल्य सागर ।
आनंद घागर । विश्वरूपी ॥३॥
सदैव पाठीशी । श्री स्वामी समर्थ ।
कार्य होई सार्थ । कृपेमुळे ॥४॥
बाप्पा गणराया । दे बुद्धीला गती ।
विवेकाची मती । सर्वांनाच ॥५॥
आजच्या दिवशी । योग हा घडावा ।
नित्यची करावा । परमार्थ ॥६॥
करते ही 'उमा' । अखंड साधना ।
जीवनी याचना । देवतांची ॥७॥