Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Arun V Deshpande

Inspirational

2  

Arun V Deshpande

Inspirational

कविता - आपले मन

कविता - आपले मन

1 min
7.3K


 या मनाची गंमत मोठी, खरेच कळत नाही
 कितीही मिळाले तरी आपले मन भरत नाही॥

 आशाळभूत नजर सदा भिरभिरत असते
 भरले पोट जरी, पुन्हा पुन्हा खावेसे वाटते||

 त्याला  मिळाले ,मला का बरे मिळत नाही
 कितीही मिळाले तरी आपले मन भरत नाही||

 चार भिंतीच्या घरात, हे मन काही  रमत नाही
 नाक खुपसण्या शिवाय याला करमत नाही||

 सुख दुसऱ्याचे तसे  याला पाहवतही  नाही
 कितीही मिळाले तरी आपले मन भरत नाही||

 मर्यादा स्वतःची  किती? लायकी किती आहे?

या भानगडीत मन कधी पडतही नाही||

 स्वताच्या चुका कधी चुकूनही शोधत नाही

 कितीही मिळाले तरी आपले मन भरत नाही||

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational