फातिमाजी ( अभंग रचना )
फातिमाजी ( अभंग रचना )
पहिली सनदी । शिक्षिका जाहली ।
जेथेच शिकली । फातिमाजी ॥ १ ॥
उस्मान शेख तो । मित्र ज्योतीबाचा ।
भाऊ फातिमाचा । पाठीराखा ॥ २ ॥
राहण्यास जागा । विरोध पत्कारे ।
शिक्षणाची व्दारे । खुले झाले ॥ ३ ॥
फातिमा घेतसे । शिक्षण चांगले ।
संघर्ष पाहिले । याच डोळा ॥ ४ ॥
सावित्री माईची । सावली जाहली ।
सोबतीने झाली । तिही माई ॥ ५ ॥
संघर्ष दडवी । व्यवस्था इथल्या ।
ज्ञान ज्योती झाल्या । दोघी जणी ॥ ६ ॥