लोकशाही ( अभंग रचना )
लोकशाही ( अभंग रचना )
1 min
210
मताधिकार तो I संपुष्टात आला |
निवडून गेला | भलताच || १ ||
मतदान यंत्र l यंत्रच असते l
सॉफ्टवेअर ते l काम करी |I २ ||
हेराफेरी सारी | ती तंत्रज्ञानाची l
का बाळगायची ? | खोटी आशा ll ३ l|
वेळ वाचवण्या I विश्वासहार्तता |
ती लटकवता | अधांतरी |l ४ Il
हुकूमशाही ती | येवून ठेपली |
भूतकाळ झाली । लोकशाही ॥ ५ ॥