ती
ती
कळले नाही कसे माझं मजला
जीव माझा तिच्यावर जडला----|| धृ||
नुकताच व्हलेंटाईन डे झाला
जाग आली पत्र लिहिण्याला
प्रेम पत्राचा मचकूर केला
गुलाबाची फुले संगतीला
आठवत होतो मी सखीला ......||१||
माझी बालपणची सखी ती
आई -बापानी दिली सोबती
परिवाराची आहे आवडती
संगे माझ्या कायमची होती
ती आयूष्यात संगतीला------||२||
क्षणा क्षणाला साथ लाभाली
वर्ग मैत्रीण माझी ती झाली
प्रेम होते एकमेकावर
दहावीनंतर पडले अंतर
काही बदल भासू लागला........||३||
नाही सोडला तिचा मी हात
जन्माची तिची मला साथ
ऋण होते तिचे माझ्यावर
दोन जीवांचा हा व्यवहार
केलं व्यक्त दोघात प्रेमाला......||४||
प्रेम आंधळ असतं बरं का
दुसरे कोणावर करूही नका
ती आहे आम्हा सर्वांच्यासाठी
तीच माझी माय बोली मराठी
कधी नाही सोडलं लाडकीला......||५||