माय रमाई
माय रमाई
पतीस आधार देत आई
सदा उभी माय तू रमाई
पहात वाळवंटी अनाथा
तहानल्याची झरा तू बाई
दर्शन दीनास माणसाचे
भिमात दिसे तुला विठाई
तुफाना धाडून दूरदेशी
मनोरमा जिंकली लढाई
रमाच होती म्हणून बाबा
जगातले मारले कसाई
पतीस आधार देत आई
सदा उभी माय तू रमाई
पहात वाळवंटी अनाथा
तहानल्याची झरा तू बाई
दर्शन दीनास माणसाचे
भिमात दिसे तुला विठाई
तुफाना धाडून दूरदेशी
मनोरमा जिंकली लढाई
रमाच होती म्हणून बाबा
जगातले मारले कसाई