माझी कविता
माझी कविता
1 min
281
शब्द फुलांची गुंफून रत्न माळ
माझी कविता जोडी आत्म्याशी नाळ
श्वासाविन जसे जगणे अशक्य
काव्य करते गंधित मम वाक्य
सुखदुःख भेटता आधार वाटे
अलगद वेचते बोचता काटे।
सरस्वती कृपेचे लाभले दान
शब्दप्रभू होण्यातच खरी शान
घालायची शब्दपुष्पांनी फुंकर
आत्मभान राखायचे निरंतर ।
माझी कविता नादमाधुर्य ध्वनी
पाझरते अमृतास शब्दांतुनी